कोयता बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी एमआयडीसीतून अटक

0
648

भोसरी, दि. २५ (पीसीबी) – कोयता हे घातक हत्यार बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भोसरी एमआयडीसी पोलिसांनी सोमवार (दि.२२) सकाळी दहाच्या सुमारास अनुकुल चौक भोसरी एमआयडीसी येथे केली.

नागेश बाबु तुळसे (वय १८, रा. आण्णासाहेब मगर स्टेडियम मागे, पिंपरी) असे कोयत्यासह अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यावर आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नागेश हा स्वत:जवळ घातक कोयता बाळगत असल्याची माहिती भोसरी एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिसांनी अनुकुल चौक येथे सापळा रचून नागेश याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ घातक असा कोयता आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करुन नागेशला अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक अमोल डेरे तपास करत आहेत.