कोण कुणाच्या पाठीत खंजीर खुपसतो, हे बघतोच; धनजंय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर घणाघात

0
490

बीड, दि. ११ (पीसीबी) – माझ्या विरोधात लढण्याची आमच्या बहीणाबाईंची इच्छा येत्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण करतो. कोण कुणाच्या पाठीत खंजीर खुपसतो,  हे  त्यावेळेला कळेल, असा टोला राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना लगावला आहे.

काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारासाठी चकलंबा येथे आज (गुरूवार) जाहीर सभा झाली. यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर जोरदार हल्ला चढवला.

मुंडे म्हणाले की, उठसूट आमच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या बहीणाबाई विधानसभा निवडणुकीत कोणा कोणाच्या पाठीत खंजीर खूपसणार ? गेवराईत लक्ष्मण पवार की बदामराव पंडित, आष्टीत भिमराव धोंडे की सुरेश धस, माजलगावात आर.टी.देशमुख की मोहन जगताप याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे मुंडे म्हणाले.

बीड जिल्ह्यातील राजकीय भिष्माचार्य शिवाजीराव दादावर गुन्हा नोंदवून बहिणाबाई तुम्ही गंभीर चूक केली आहे.  दादावर प्रेम करणारा जनसागर तुम्हाला आता घरी पाठवल्या शिवाय गप्प बसणार नाही,  असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.