कोणीही पुढे आला तरी नीट करू; रावसाहेब दानवेंचा अर्जुन खोतकरांना इशारा

0
753

कोल्हापूर, दि. १४ (पीसीबी) – आतापर्यंत अनेकजण समोर आले आहेत. कोणीही पुढे आला तरी नीट करू,  असा थेट इशारा  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे नेते व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन  खोतकर यांचे नांव न घेता दिला.

कोल्हापुरात आज (सोमवार) आयोजित पत्रकार परिषदेत दानवे  बोलत होते. यावेळी त्यांना जालना लोकसभा मतदारसंघात मंत्री अर्जुन खोतकर आणि दानवे यांच्यात सुरू असलेल्या  वादावरून छेडले असता दानवे यांनी  मीच रिंगणात असणार आहे.  कोणीही पुढे आला तरी नीट करू, असे इशारा त्यांना खोतकर यांना दिला.

भाजप-शिवसेना युतीवर बोलताना ते म्हणाले की, मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे, अशी आमची इच्छा आहे. युतीचा फॉर्म्युला बाळासाहेब ठाकरे असताना ठरला आहे. युतीची चर्चा राज्य पातळीवर व्हावी. जिथे जागांचा प्रश्न निर्माण होतो, त्या ठिकाणी केंद्र पातळीवर चर्चा व्हावी, असे ते म्हणाले.