कोंढवा दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत जाहीर

0
360

पुणे, दि. २९ (पीसीबी) – पुण्यातील कोंढवा दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने ४ लाखांचा मदत जाहीर केली आहे, अशी माहिती राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज (शनिवार) येथे  दिली आहे.

कोंढवा दुर्घटना बांधकाम व्यावसायिकाच्या हलगर्जीपणामुळे  झाली असावी,  असा प्राथमिक अंदाज आहे.  तसेच झोपड्यांशेजारील बांधकामामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे, असे सांगून या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहे.

पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही आज (शनिवार) घटना पहाटे २ वाजताच्या सुमारास कोंढव्यातील तालाब कंपनी समोर घडली. याप्रकरणी  महापौर टिळक यांनी  दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय   करून देण्यात येईल. तसेच इतर मदत केली जाईल,  असे आश्वासन दिले.