कॉम्रेड सुभाष सरीन यांचे निधन

0
254

पिंपरी, दि.17 (पीसीबी): जेष्ठ कामगार नेते कॉम्रेड सुभाष सरीन (वय 78) यांचे काल (गुरुवारी) रात्री दहाच्या सुमारास चिंचवड येथे एका खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झाले. 

सुभाष सरीन यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. कन्या अ‍ॅड. वैशाली सरीन या त्यांच्या कन्या तर गायक नंदीन सरीन हे त्यांचे पुत्र होते.

सुभाष सरीन हे जेष्ठ साम्यवादी नेते, पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे माजी सरचिटणीस होते. 1970 च्या दशकात पिंपरी-चिंचवड शहरातील कामगारांवरील अन्यायाविरोधात लाल बावट्याची संघटना उभी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

पुणे परिसरातील कामगार चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान होते. साम्यवादाचा तसेच कामगार कायद्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. वाचनाचीही त्यांना प्रचंड आवड होती. एक अभ्यासू कामगारनेता अशी त्यांची ख्याती होती.