केंद्रीय अन्वेषण विभाग(CBI) आणि सक्तवसुली संचालनालया(ED)च्या संचालकांचा कार्यकाळ आता वाढणार?

0
584

मुंबई, दि.१५ (पीसीबी) : केंद्रीय अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाच्या संचालकांचा कार्यकाळ आता 5 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. मोदी सरकारनं याबाबत अध्यादेश जारी केला आहे. सध्या केंद्रीय एजन्सीच्या प्रमुखांचा कार्यकाळ हा 2 वर्षासाठी आहे. आतापर्यंत दोन्ही केंद्रीय एजन्सीच्या प्रमुखांचा कार्यकाळ हा 2 वर्षासाठी कायम करण्यात आला होता. काही अपवाद सोडता कार्यकाळ संपेपर्यंत केंद्रीय एजन्सीच्या प्रमुखांना हटवलं जाऊ शकत नाही. मोदी सरकार एक वर्षासाठी त्यांना मुदतवाढ देखील देऊ शकतं.

गतवर्षी केंद्र सरकारनं ED चे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ एक वर्षांनी वाढवला होता.मिश्रा यांचा 1 वर्षाचा कार्यकाळ नोव्हेंबर 2020 मध्ये संपला. सन 1997 पुर्वी सीबीआयच्या संचालकाचा कार्यकाळ ठरलेला नव्हता आणि कोणत्याही प्रकारे केंद्र सरकार त्यांना पदावरून हटवू शकत होती. सर्वोच्च न्यायालयानं विनीत नरैन प्रकरणी निर्णय देताना सीबीआयच्या संचालकाचा कार्यकाळ हा किमान 2 वर्षासाठी असा असं ठरवून दिलं होतं.
संचालकांना काम करण्यास पुर्णपणे मोकळीक मिळेल म्हणून सर्वोच्च न्यायालयानं कार्यकाळ ठरवून दिला होता. आता मोदी सरकारनं CBI आणि ED च्या संचालकांच्या कार्यकाळाबाबत एक विधेयक आणलं आहे. ज्यामुळे दोन्ही केंद्रीय एजन्सीच्या प्रमुखांचा कार्यकाळ हा 5 वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो.