कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती

0
392

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – पाकिस्तानच्या सैन्य कोर्टाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली. १५-१च्या फरकाने हा निकाल लागला. 

न्यायालयाने कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानकडून भारतावर लावण्यात आलेल्या आरोपांना योग्य मानलेले नाही. २ वर्षे आणि दोन महिने न्यायालयाच्या १५ सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु होती.

पाकिस्तानकडून जाधव यांना काऊन्सेलर अॅक्सिस देण्यात आला नव्हता. त्यामुळे पाकिस्तानने जाधव यांना सुनावलेल्या फाशीचा पुनर्विचार करावा, अशी सूचना न्यायालयाने केली आहे.

या शिक्षेचा पुनर्विचार होत नाही तोपर्यंत त्यांना दिलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, जाधव यांना काऊन्सेलर अॅक्सिस देण्यात यावा असेही न्यायालयाने म्हटले आहे.