किराणा दुकानासमोर थांबलेल्या तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

0
492

आळंदी, दि.१६ (पीसीबी) – आई-वडील किरणा दुकानात सामान घेत असताना तरुणी दुकनाच्या समोर रस्त्याच्या बाजूला थांबली. त्या तरुणीच्या गळ्यातील २५ हजारांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना सोमवारी (दि. 15) रात्री सव्वाआठ वाजता आळंदी येथे घडली.

धनश्री सुभाष गावडे (वय 21, रा. पांजरपोळ, भोसरी) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनश्री त्यांच्या आई-वडिलांसोबत आळंदी येथे किरणा माल घेण्यासाठी गेल्या होत्या. सोमवारी रात्री सव्वाआठ वाजता आळंदी येथील योगीराज चौकाजवळ कांतीलाल चोरडिया यांच्या सतीश ट्रेडिंग कंपनी या दुकानातून फिर्यादी यांचे आई-वडील किराणा माल घेत होते. त्यामुळे फिर्यादी दुकानासमोर रस्त्याच्या बाजूला थांबल्या होत्या. त्यावेळी एका दुचाकीवरून दोन चोरटे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 25 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.