किरकोळ कारणांवरून नवीन दुचाकी पेटवली

0
240

पिंपरी,दि.२१(पीसीबी) – किरकोळ कारणावरून दोघांनी मिळून एक नवीन दुचाकी पेटवून दिली. ही घटना बुधवारी (दि. 19) पहाटे साडेतीन वाजता निघोजे गावात घडली.

अभिषेक विनोद सिंग (वय 31, रा. गौतमनगर, नाशिक) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमोल लहानू सानप (रा. निमगाव गुळवंस, ता. सिन्नर, जि. नाशिक), विशाल किशोर बराटे (रा. राजन फोल गुठेवाडी, ता. राहता. जि. नाशिक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये किरकोळ कारणांवरून वाद झाला. यावरून आरोपींनी गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता फिर्यादी सिंग यांची 60 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची पॅशन प्रो दुचाकी (एम एच 15 / एच डी 9443) पेटवून दिली. फिर्यादी सिंग यांनी मागील चार महिन्यांपूर्वी नवीन दुचाकी घेतली होती. पेटवून दिल्याने दुचाकी जळून खाक झाली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.