काव्यवाचनात सोलापूरचे भरतकुमार गोरे पहिले तर पिंपरी चिंचवडचे अण्णा जोगदंड द्वितीय क्रमांक.

0
81

पिंपरी, दि.१० (पीसीबी) – कामगार कल्याण मंडळ पुणे गटातून आयोजित केलेल्या काव्यवाचनास उत्स्फूर्त प्रतिसाद. सोलापूरचे भरतकुमार गोरे पहिले तर पिंपरी चिंचवडचे श्रीकांत उर्फ अण्णा जोगदंड द्वितीय क्रमांक. कामगार मंडळांने पुणे गटातील एकूण पाच जिल्ह्यामधून काव्य वाचनाचे आयोजन केले होते, मंडळांने सध्या कार्यरत असलेल्या कामगारासाठी आयोजन केले होते 6जानेवारी पासून अर्ज भरून आपली रचना आपल्या जवळच्या कामगार कल्याण मंडळात 19 जानेवारीपर्यंत अर्जासह रचना मागवल्या होत्या. दिनांक 23.1.2023 रोजी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झालेल्या 40 कवींनी आपापल्या दर्जेदार रचना सादर केल्या यामध्ये उत्कृष्ट पहिल्या तीन रचनांना व एक उत्तेजणार्थ रचनांना रोख रक्कम मंडळाच्या वतीने देण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक कवी भरतकुमार गोरे कामगार कल्याण केंद्र सिद्धेश्वर सोलापूर, रचना “असले काय आणि नसले काय?”

द्वितीय क्रमांक श्रीकांत उर्फ अण्णा जोगदंड ,कामगार कल्याण केंद्र उद्योगनगर पिंपरी चिंचवड शहर . रचना “पर्यावरण.” तृतीय क्रमांक मयुरी ठोंबरे कामगार कल्याण केंद्र दमानीनगर सोलापूर ,रचना “कोटी कोटी प्रणाम” उत्तेजनार्थ जयंत डावरे, कामगार कल्याण केंद्र उद्योग नगर पिंपरी चिंचवड, रचना ,”व्यथा कंत्राटी कामगारांची” या काव्य सकाव्यवाचनाचे परीक्षक म्हणून निलांबरी कुलकर्णी ज्येष्ठ कवयित्री आणि अनंत चौगुले ज्येष्ठ कवी यांनी काम पाहिले .

यावेळी सहाय्यक आयुक्त पुणे मनोज पाटील व सोलापूर साहित्य समाधान भोसले यांनी पहिल्या आलेल्या तिन्ही कामगारांचे भरभरून कौतुक केले आम्ही असे यापुढे पुणे नागपूर व मुंबई सारख्या वेगवेगळ्याशहरात भविष्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले .यावेळी उद्योगनगर कामगार कल्याण केंद्रातून आलेल्या दुसरा व उत्तेजणार्थ कामगारांचे केंद्र संचालक प्रदिप बोरसे यांनी कौतुक केले.यावेळी सचिन आवळेकर कामगार कल्याण सोलापूर गट पुणे विजय शिंगाडे कल्याण अधिकारी ,संघसेन जकतकर ,चंद्रकांत घाडगे, दीपक गावराखे,राहूल पवार, विजय खराडे,प्रदिप बोरसे यांनी सयोजनात सहभाग नोंदविला तर काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन कल्याण निरीक्षक राजेंद्र निकम यांनी केले.