कार्ला एकविरा देवी यात्रेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी

0
289

पुणे, दि. ११ (पीसीबी) : लोणावळ्याजवळील कार्ला येथील एकविरा देवी यात्रेदरम्यान शनिवारी मोठा वाद निर्माण झाला होता. यावेळी झालेल्या हाणामारीत ठाणे येथील एका भाविकाचा मृत्यू झाला तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. मोबाईल चोरीच्या संशयावरुन गर्दीत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी एका गटाकडून बांबू आणि धारदार शस्त्रांनी मारहाण करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, ठाण्यातील ४९ वर्षीय भाविक मनोज पाटील यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिकेत ते कार्यरत होते. पाटील हे आपले दोन मित्र हर्षल पाटील आणि राहुल पाटील या दोघांसह एकविरा देवीच्या यात्रेला आले होते.