काँग्रेसला प्रियंका गांधीमध्ये इंदिरा गांधी दिसतात, तर डॉ. प्रकाश आंबेडकरांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिसत नाहीत का? – आमदार इम्तियाज जलील

0
482

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – काँग्रेसला प्रियंका गांधीमध्ये दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी दिसत असतील, तर भारीप बहुजन महासंघाचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिसत नाहीत का? असा सवाल एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी आज (सोमवार) येथे केला.