काँग्रेसच्या विजयाने खचून जाऊ नका; मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्त्यांना बळ  

0
494

मुंबई, दि. २० (पीसीबी) –  काँग्रेसच्या विजयाने खचून जाऊ नका. महाराष्ट्रात नंबर वन भाजप आहे. शिवसेना स्वळावर लढली, तरी आपण समर्थ आहोत.  शिवसेना सोबत असेल, तर वेल अँड गुड. भाजपच्या बाजूने सकारात्मक चर्चा आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.  

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नुकतीच पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.

मीडियातील बातम्या ऐकून चर्चा करू नका. मिशन मोडमध्ये आपल्याला जायचे आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी रोड मॅप तयार केला आहे. त्यानुसार आपल्याला काम करायचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितल्याची माहिती मिळत आहे.