काँग्रेसच्या ‘या’ माजी आमदारांचं निधन; वाढदिवसाच्या दिवशीच दिला जगाला निरोप

0
207

मुंबई, दि.१५ (पीसीबी) : काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन झालं आहे. अलिबाग उरण मतदारसंघाचे माजी आमदार असणारे मधुकर ठाकूर यांनी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वयाच्या ७४ व्य वर्षी श्वास घेतला. आजच म्हणजे १५ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असतो. दुर्दैवाने वाढदिवशीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

दरम्यान, मधुकर ठाकूर गेल्या तीन ते चार वर्षांपासून आजारी होते. झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि २००४ ते २००९ या काळात अलिबाग-उरण मतदारसंघाचे ते आमदार होते. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. दुपारी २ वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.