काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर प्राणघातक हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

0
543

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. चिंचवड, तानाजीनगर येथे गुरूवारी रात्री हा हल्ला झाला. विशेष म्हणजे गणेश लोंढे यांचा शुक्रवारी (दि. ५) वाढदिवस आहे.