“कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी मोदी सरकार बुलेट ट्रेनचा प्रकल्प स्थगित का करत नाही?”

0
465

नवी दिल्ली,दि.२४(पीसीबी) – कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी मोदी सरकार बुलेट ट्रेनचा प्रकल्प स्थगित का करत नाही? असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करुन त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशातल्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी मोदी सरकारने बुलेट ट्रेनचा लाखो-कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प स्थगित का केला नाही?, असा सवाल राहुल गांधींनी केला आहे.

दरम्यान कोट्यवधी रुपयांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणि केंद्रीय व्हिस्टा सौंदर्यकरण परियोजना यांसारख्या योजनांना स्थगिती देण्याऐवजी कोरोनाशी सातत्याने लढणाऱ्या केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशाच्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करणं हा सरकारचा असंवेदनशील आणि अमानवीय निर्णय आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.