कर्नाटक आणि झारखंडमध्ये दोन भूकंप

0
235

पिंपरी, दि. 5 (पीसीबी): गेल्या काही दिवसांत देशात वारंवार भूकंपाचे धक्के बसले आहेत. शुक्रवारी सकाळी कर्नाटक आणि झारखंडमध्ये दोन भूकंप झाले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने सांगितले की कर्नाटकच्या हंपी येथे सकाळी 6.55 वाजता भूकंपाचे झटके जाणवले आहे. तथापि, जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.या भूकंपाची तीव्रता ही 4.0 रेस्टर स्केल मोजण्यात आली.

या व्यतिरिक्त झारखंडमधील जमशेदपूरला कर्नाटकपेक्षा तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने सांगितले की जमशेदपूर येथेही पहाटे 6.55 मिनिटालाच भूकंप जाणवला परंतु कर्नाटकातील भूकंपापेक्षा त्याची तीव्रता जास्त होती. रिअॅक्टर स्केलवरील या भूकंपाची तीव्रता 4.7 मोजण्यात आली असल्याचे संस्थेने म्हटले आहे.