कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यानंतर आता ‘या’ मुख्यमंत्र्यांना सुद्धा कोरोनाची लागण…

0
188

कर्नाटक, दि.१८ (पीसीबी) : जनता दल (सेक्युलर) नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांची कोविड -१९ चाचणी पॉझिटिव्ह आली असून आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांना बेंगळुरूच्या अपोलो रुग्णालयात दाखल केले आहे.

61 वर्षीय माजी मुख्यमंत्र्यांनी आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगितले. ते म्हणालेत कि, ‘माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्यांनी सर्वांनी आपली कोविड चाचणी करून घ्यावी. आणि स्वत:ला आयसोलेट करून घ्यावे. अशी मी विनंती करतो.’

यापूर्वी शुक्रवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पाही कोविड पॉझिटिव्ह आले होते. 78 वर्षीय येडियुरप्पा आठ महिन्यांत दुसऱ्यांनदा कोविड पॉझिटिव्ह आले असून याआधी ते २ ऑगस्ट २०२० रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते.