कर्जत-जामखेड शहराच्या विकासासाठी वेगळा निधी आणू – रोहित पवार

0
958

कर्जत,दि.१८(पीसीबी) – कर्जत व जामखेड शहराच्या विकासासाठी आपण वेगळा निधी आणू, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. कर्जत येथे स्त्री फाउंडेशन तर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या फाउंडेशनच्या वतीनं नवनिर्वाचित आमदार रोहीत पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

कर्जत-जामखेडमधील जनतेनं माझ्यावर खुप प्रेम केलं आहे. २५ वर्षांनंतर या मतदार संघात स्त्रीशक्तीनं परिवर्तन घडविलं. माझ्या विजयात स्त्री शक्तीचं मोठ योगदान आहे, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

महिला, शेतकरी, शेतमजुर, युवक, व्यापारी, वृद्ध अशा प्रत्येक वर्गाच्या अनेक अडचणी आहेत. या अडचणी सोडवण्याला मी प्राधान्य देणार आहे, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.