कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

0
367

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते 88 वर्षांचे होते आणि गेले काही महिने आजारी होते. त्यांच्यावर आज, रविवारी दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान ओशिवरा स्मशानभूमीत अंतिम विधी करण्यात येतील.

महाराष्ट्र टाइम्समध्ये ते आणि मी बरीच वर्षं कसम केलं. अत्यंत मोकळा व उमदा स्वभाव. विनोद करण्याची त्यांची हातोटी आगळी होती आणि ते सतत गमतीजमती करीत. ते आधी दै. लोकसत्तामध्ये होते. अनेक मराठी नियतकलिकांत त्यांनी विपुल लिखाण केले आहे. राज्य नाट्य स्पर्धा तसेच अन्य नाट्य व एकांकिका स्पर्धेचे परीक्षक म्हणून त्यांनी काम केले. त्यांचे नाट्य परीक्षण अतिशय मुद्देसूद असे. ते लिहिताना त्यांनी नाट्य क्षेत्रातील जवळच्या मित्रांचाही मुलाहिजा ठेवला नाही.

कमलाकर नाडकर्णी यांना विनम्र आदरांजली. त्यांना विसरणे अशक्य आहे. वि. वि. करमरकर यांच्यापाठोपाठ आणखी एक ज्येष्ठ सहकारी मी गमावला. ते आजारी असल्याचं कळलं होतं. त्यामुळे फोन केला होता. पण त्यांना नुकतंच रुग्णालयातून आणलं होतं. त्यांना बाहेरून कोणी भेटायला येऊ नये, इन्फेक्शनची शक्यता आहे, असं डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितलं होतं. त्यामुळे जाण्याचं टाळलं.