‘कभी कभी लगता है अपुन ही भगवान है’, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

0
452

नवी दिल्ली,दि.१८ (पीसीबी) –  -संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. त्यासाठी खासदार संजय राऊत दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्लीतूनही आज त्यांची भाजपाविरुद्धची तुफान फटकेबाजी सुरूच आहे.

आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी भाजपा नेत्यांना लक्ष्य केलं. भाजपा नेते स्वत:ला देव समजत आहेत. म्हणूनच, आपण काहीही करू शकतो, असे त्यांना वाटते. कभी कभी लगता है, अपुनही भगवान है… असा त्यांचा समज झाला आहे. मात्र, देशात मोठ-मोठे बादशहा येऊन गेले, पण लोकशाही कायम आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांनी हा समज चुकीचा आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे. एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी कुणीच्या मालकीची संपत्ती नाही. त्यामुळे आम्हाल न विचारत घेता, शिवसेनेला एनडीएमधून बाहेर काढलेच कसे? असा सवालही राऊत यांनी विचारला आहे.
दरम्यान, शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असली तरी, अजून काँग्रेसप्रणीत यूपीएमध्ये सामील झालेली नाही. तर, शिवसेना युपीएमध्ये सामिल होणार नसल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.