औषध प्रशासन विभागाची कारवाई; ‘या’ ठिकाणी केला तब्बल 26 हजारांचा गुटखा जप्त

0
212

चाकण, दि.१० (पीसीबी) : औषध प्रशासन विभागाने चाकण येथे एक कारवाई केली. त्यात विभागाने 26 हजार 100 रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थ (गुटखा) जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. 9) सकाळी एकता नगर, चाकण येथे करण्यात आली.

उदयशंकर देवनारायण गुप्ता (वय 55, रा. एकतानगर, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी राहुल महादेव खंडागळे (वय 36) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू सुपारी यांचे उत्पादन, साठा, विक्री आणि वाहतूक यावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही आरोपी गुप्ता याने मोठ्या प्रमाणात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवला. याबाबत माहिती मिळाल्याने औषध प्रशासन विभागाने मंगळवारी सकाळी अकरा वाजता गुप्ता याच्या घरात छापा मारला. त्यात 26 हजार 100 रुपये किमतीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. प्रशासन विभागाने हा ऐवज जप्त करून गुप्ता याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 328, 179, 188, 272, 273, अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.