औंधमध्ये एकाची सत्तर हजारांची ऑनलाईन फसवणूक

0
404

औंध, दि. ३० (पीसीबी) – ओटीपी नंबरची माहिती घेत बँक खात्यातून परस्पर ७० हजारांची रक्कम स्वत:च्या खात्यात जमा करुन एकाची फसवणूक  करण्यात आली. ही घटना सोमवार (दि.१७) औंधमध्ये घडली.

याप्रकरणी लहु श्रीरंग शिंदे (वय ४३, रा. शिवनेरी रेसीडेन्सी, औंध मिलीटरी कॅम्प, औंध) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.१७) जूनला लहु शिंदे यांनी अशोक मोटर्स यांचे उज्जैन स्मॉल फायनान्स बँकेच्या खात्यामध्ये २२ हजार रुपये ट्रान्सफर केले. ही रक्कम अशोक मोटर्स यांच्या खात्यावर गेल्यानंतर लगेचच त्यांच्या खात्यामधून डेबीट झाली. याबाबत शिंदे यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भिम अॅपवरुन कस्टमर केअरला तक्रार केली असता एकाने शिंदे यांना ‘तुमचे पैसे तुम्हाला रिफंड होतील परंतु तुम्हाला आलेला ओटीपी नंबर सांगा’ असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शिंदे यांना प्राप्त झालेला ओटीपी मिळवून शिंदे यांच्या खात्यातून ७० हजार रुपये आरोपीने स्वत:च्या अकाऊंटला ट्रान्सफर केले. या फसवणुकीबाबत शिंदे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.