‘ओएलएक्स’ द्वारे तिघांनी घातला एकाला अडीच लाखांचा गंडा

0
627

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – कार खरेदी करण्यासाठी ‘ओएलएक्स’ या साईटवर जाऊन पसंत पडलेल्या कारच्या मालकाला फोन करुन सौंदा पक्का केला. मात्र कार मालकाने कार खरेदी करणाऱ्या तरुणाकडून वेळोवेळी तिन बँक खात्यांवर एकूण २ लाख २४ हजार ९९५ रुपये टाकण्यास सांगितले. पैसे मिळताच त्या कार मालकाने खरिदार तरुणाला कार तर दिलीच नाही. तसेच त्याचे पैसे ही बुडवले. ही घटना सोमवार (दि.२१) ते बुधवार (दि.२३) दरम्यान काळेवाडी आणि पिंपरी येथे घडली.

मयुर दिलीप चव्हाण (वय १९, रा. मयुर निवास, तापकीरनगर, काळेवाडी) असे फसवणुक झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तामीर तेजकुमार (रा. अहमदाबाद, गुजरात), कल्लु आणि राम या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयुर यांना कार खरेदी करायची होती. यामुळे त्यांनी ओएलएक्स या कार खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईटला भेट दिली. तेथे त्यांना आरोपींची एक स्वीफ्ट डीजायर कार पसंत पडली. यावर त्यांनी त्यांना फोन करुन २ लाख २४ हजार ९९५ रुपयात सौदा पक्का केला. सौदा होताच मयुर याने तिघा आरोपींच्या तिन विविध बँक खात्यांमध्ये एकूण २ लाख २४ हजार ९९५ रुपये भरले. पैस मिळून देखील आरोपींनी मयुर यांना कारही दिली नाही. तसेच पैसेही परत केले नाही. यावर मयुर याला त्याची फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात तामीर, कल्लु आणि राम या तिघांविरोधात तक्रार दाखल केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.