ऑलिंपिकबाबत निर्णय घ्यावा लागणार

0
179

टोकियो, दि.१६ (पीसीबी) : कोविड १९च्या संक्रमणाची लाट सध्या जोरात आहे. अशा परिस्थितीत ऑलिंपिक स्पर्धा सुरक्षित पातळीवर घेणे एक आव्हान असून, आता ऑलिंपिकबाबत निर्णय घेण्याची पु्न्हा वेळ आली आहे, असे टोकियो ऑलिंपिक समितीच्या मुख्य सेईको हाशिमोटो यांनी मान्य केले.

अशा परिस्थितीत समितीसमोर स्पर्धा पुढे ढकलणे किंवा रद्द करणे असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. जपानमध्ये सध्या चौथी लाट आली असून, सरकारने तेथील १० भागातील आणिबाणी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑलिंपिक आता शंभर दिवसांवर आले असून संयोजकांनी नव्याने निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट केले आहे.

संकट मोठे आहे, अशा वेळीही आम्ही स्पर्धा रद्द करण्याच्या मनस्थितीत नाही. पुन्हा एकदा स्पर्धा पुढे ढकलली जाऊ शकते, असे हाशिमोटो म्हणाल्या. खेळाडू आणि जपानी नागरिकांचा विचार करता स्पर्धा सुरक्षितच व्हायला हवी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, यावर त्यांचा भर होता.

जपान सरकारने सध्या आईची, कांगावा, साईतामा आणि चिबासह अन्य सहा ठिकाणची परिस्थिती नियंत्रणाखाली असून, यामध्ये टोकियो आणि ओसाका शहरांचाही समावेश आहे.

जपानमधील संसर्गाची चौथी लाट असून, रोज हजारोने बाधितांची संख्या वाढत आहे. ओसाका येथे आज एकाच दिवशी बाराशेच्या आसपास रुग्ण आढळले आहे. हा विषाणू सर्व प्रथम ब्रिटनमध्ये आढळला असून, त्याचाच प्रादुर्भाव अधिक वाढत आहे. टोकियो शहरातही रुग्णांची संख्या वाढत असली, तरी सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. मात्र, तरीही जपानी नागरिकांचा ऑलिंपिक घेण्याला विरोधच आहे.

कोविड १९च्या संसर्गाची स्थिती अशीच वाढत गेल्यास ऑलिंपिक रद्द करण्याशिवाय दुसरा पर्यायच आमच्यासमोर नाही, असे सध्याच्या सरकारमघील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. परदेशी पाहुण्यांना बंदी घालण्यात आली असली आणि स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळविली जाणार असली, तरी बाहेरुने येणारे खेळाडू आहेतच की याची भिती जपानी नागरिकांनी घेतली आहे. अशाच भितीच्या वातावरणातच सध्या ऑलिंपिक टॉर्चचा जपानमधील प्रवास सुरू आहे.

पुन्हा पुढे ढकलणे हा पर्याय असूच शकत नाही, या वेळी स्पर्धा रद्द करणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध असेल, असे ऑलिंपिक समिती आणि जपानी सरकारच्या एका गटाचे म्हणणे आहे. केवळ नागरिकच नाही, तर जपानमधील एक हजार डॉक्टरांचाही कल अजमाविण्यात आला. त्यात डॉक्टरांनी देकिल स्पर्धा घेण्यासाठी ही वेळ योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी ऑलिंपिक स्पर्धा लक्षात घेता सरकार संसर्ग आणखी वाढणार नाही यासाठी शक्य ते प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले आहे.