एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा नवी दिल्ली येथे सीईडी कडून गौरव

0
195

पिंपरी,दि. १६ (पीसीबी) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथिल एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा दिल्ली येथिल सीईडी (सेंटर एज्युकेशन ऑफ डेव्हलपमेंट) या संस्थेने ‘सीईडी स्टार रेटींग के – १२ स्कूल अवॉर्ड २०२१’ हा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात छत्तीसगडचे माजी राज्यपाल शेखर दत्त आणि मालदिवचे शिक्षण राज्यमंत्री डॉ. अब्दुल्ला रशिद अहमद यांच्या हस्ते एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांनी १२ मार्च रोजी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी इंदिरा गांधी ओपन युनिर्व्हसिटीचे माजी कुलगुरु डॉ. एम. एम. पंत, सीबीएसईचे संचालक डॉ. विश्वजीत साहा, सीबीएसईचे माजी संचालक जी. बालसुब्रमण्यम, एम. व्ही. प्रसाद राव, एनसीआरटीचे सचिव मेजर हर्ष कुमार, सीबीएसईचे सहसचिव आर. पी. सिंग आदी उपस्थित होते.

शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी नाविण्यपुर्ण पध्दतींचा अवलंब करणारी ‘शाळा’ म्हणून हा पंचतारांकीत पुरस्कार देण्यात आला आहे.
स्कूलला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.