एसबीआय बँकेच्या एटीएम मधून अवघ्या 15 मिनिटात बॅट-यांची चोरी

0
213

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – स्टेट बँक ऑफ इंडिया अजमेरा शाखा येथील एटीएमच्या बॅटरी दोन अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि. 13) सकाळी आठ ते सव्वाआठ वाजताच्या कालावधीत घडली.

अभिलाषा बाबुराव जैन (वय 46, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 15) फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमेरा येथे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरमधून 37 हजार 200 रुपये किमतीच्या बॅटरी दोन अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना सकाळी आठ ते सव्वाआठ वाजताच्या कालावधीत घडली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.