एम.यु.महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

0
342

पिंपरी,दि.१२(पीसीबी) – येथील मंघनमल उधाराम वाणिज्य महाविद्यालयात जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची व्याख्यानमाला आयोजीत केली होती.या व्याख्यानमालेचा विषय आव्हानांची निवड असा होता.

डॉ.मंदाकीनी भट्टाचार्य,(कोलकाता) म्हणाल्या की , “स्त्रीयांनी आव्हाने स्वीकारताना प्रथम स्वतःलाच आव्हान द्यावे तरच ते जीवनातील आव्हाने स्विकारू शकतील.” आजकाल स्त्रीया हया रिक्षा चालवण्यापासून ते अवकाशयान चालवण्यापर्यंत प्रगती केली आहे. मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर स्त्रीया कोणतेही आव्हान अगदी सहज पेलू शकतात. ब-याच महिलांना हया त्यांच्या हक्काविषयी अनभिज्ञाम्प असतात. आपली कुचंबणा होईल या भितीने महिला पुढे येण्यास धजावत नाहीत.उदा. पोलिस ठाण्यात एखादी तक्रार नोंदविण्यास त्या कचरतात.प्रत्येक स्त्रीने पुरूषांप्रमाणे सर्व क्षेत्रात पुढाकार घेऊन काम केले पाहीजे.असे प्रतिपादन अ‍ॅड.रिया माधवानी यांनी केले.

कुमारी शालू रामनानी म्हणाल्या की, महिलांनी कायम सकारात्मक राहावे. कोणत्याही गोष्टींमुळे मानसिक खच्चीकरण होऊ न देता आनंदी रहावे.तसेच महिला सशक्तीकरणावर सामाजिक कार्यकर्त्या कुमारी पंक्ती जोग व उद्योजिका सायली पोंक्षे यांचीही व्याख्याने झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन डॉ.लिना मोदी, प्रा.अस्मिता भगत व श्री.हेमंत राजेस्थ यांनी केले. तसेच महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.विनीता बसंतानी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.