एटीएममध्ये जिलेटिनचा स्फोट करून चोरट्यांनी पळवली लाखोंची रोकड

0
283

चिखली, दि. २७ (पीसीबी) – एटीएम सेंटरमध्ये जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट करून तीन अज्ञात चोरट्यांनी 16 लाख 51 हजार चारशे रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 26) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील चिंबळी येथे घडली.

विजय तुकाराम जगताप (वय 34, रा. चिखली) यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील चिंबळी फाटा ते आळंदी रोडवर बहिरट कॉम्प्लेक्समध्ये ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी स्फोटकांच्या सहाय्याने एटीएम सेंटरमध्ये स्फोट केला. त्यानंतर एटीएम मधून 16 लाख 51 हजार चारशे रुपये रोख रक्कम ट्रेसह चोरून नेली. पोलीस उपनिरीक्षक जोंधळे तपास करीत आहेत.