एक रुपयांत १० सॅनिटरी नॅपकिन; मंत्री हसन मुश्रिफ यांची माहिती

0
266

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : दारिद्र्यरेषेखालील महिला, बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. ही योजना १५ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी (ता. २८) दिली. मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. गेल्या वर्षात मासिक पाळीच्या वेळी काळजी न घेतल्याने व सफाईच्या कमीमुळे जगभरातील आठ लाख महिलांचा मृत्यू झाला. हे प्रमाण कमी करण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील महिलांना नाममात्र एक रुपयामध्ये ग्रामविकास खात्याकडून १० सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहेत.