एका रात्रीत कोट्यधीश झालेला जुगारी फौजदार अखेर निलंबित

0
122

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे याला चौकशीअंती निलंबित कऱण्यात आले आहे. प्रथम ८५ हजाराच्या लाचखोरीत सापडला आणि नंतर ड्युटीवर असताना ऑनलाईन जुगार खेळात त्याला दीड कोटींची लॉटरी लागल्याने तो चर्चेत आला होता. सर्व माध्यमांत त्याच्या बातम्या झळकल्याने एक प्रकारे जुगाराला प्रोत्साहन मिळाल्यासारखे होते.

ऑनलाइन गेम खेळून दीड कोटींचा बक्षीस लागले मात्र, त्याच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम होती. कारण ऑनड्यूटी असताना ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे नेते अमोल थोरात यांनी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पीएसआय सोमनाथ झेंडे हा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयातील आरसीपीमध्ये नेमणुकीस आहे. मंगळवारी बांग्लादेश विरूद्ध इंग्लंडच्या क्रिकेट मॅचवर ऑनलाईन गेमिंगमध्ये त्याच्या टीमला दीड कोटींचे बक्षीस लागले. मात्र, सर्वत्र प्रसिद्धी मिळल्यानंतर पीएसआय सोमनाथ झेंडे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता..