उद्या बहुमत सिद्ध करून दाखवणारच – चंद्रकांत पाटील

0
410

मुंबई,दि.२६(पीसीबी) – उद्याच बहुमत सिद्ध करा, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करायाला आम्ही तयार आहोत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

उद्या आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवणारच, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. न्यायालयाच्या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावर बैठक बोलावली आहे. देवेंद्र फडणवीसांकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी आता ३० तास उरले आहेत.