उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंचा मुका घेऊन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

0
584

सातारा, दि. ३१ (पीसीबी) – सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या मनोमिलनाची चर्चा जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे.  शिवेंद्रराजे भोसले यांचा वाढदिवस असल्याने उदयनराजे यांनी  शिवेंद्रराजेंचा मुका घेतला आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना दिलेल्या  या अनोख्या शुभेच्छा  सातारकरांसाठी चर्चेचा विषय ठरल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे शिवेंद्रराजेंचे बंधूप्रेम  उफाळून आल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर हे बंधूप्रेम असेच टिकावे, अशी इच्छा दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहे.

दरम्यान, उद्यनराजेंच्या विरोधात भाजपने नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने शिवेंद्रराजेंची गळाभेट घेतली.  तसेच त्यांनी चक्क एकच राजे, बाबा राजे अशा जोरदार घोषणाही दिल्या. यामुळे साताऱ्यात चर्चांना उधाण आले आहे.