उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून मोबाईल, रोकड आणि मनगटी घड्याळ चोरीला

0
232

थेरगाव, दि. ७ (पीसीबी) – घराच्या उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी 41 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 6) रात्री साडेबारा ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान कैलास नगर, थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेबारा ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला. घरातील 4 मोबाइल रोख रक्कम व एक मनगटी घड्याळ असा एकूण 41 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.