इस्त्राईल मध्ये सुरू केलेल्या शाळा तीन आठवड्यात बंद – ३४७ विद्यार्थी कोरोना बाधित, १६ हजार क्वारंटाईन

0
746

जेरूसलेम, दि. ७ (पीसीबी) – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्वप्रथम शाळा-महाविद्यालये तत्काळ बंद केली, आता त्या पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न भारतातील राज्यकर्ते करत आहेत. इस्त्राईल मधील शाळा सुरू करण्याची चूक किती महागात पडली ते पाहिल्यावर या निर्णयाचा फेरवचार करावा लागणार आहे. इस्त्राईलमधील १२० शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. अवघ्या तीन आठवड्यात या शाळांमधील तब्बल ३४७ विद्यार्थी व शिक्षक कोरना पिझिटिव्ह झाले आणि संभाव्य धोका ओळखून सरकारने तत्काळ पुन्हा सर्व शाळा बंद केल्या. आज सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्याच वेळ आल्याने त्यांचे पालक चिंताग्रस्त असून संतापले आहेत.

कोरोनाच्या प्रसार प्रामुख्याने जेरूसलेम मधील ज्यु च्या शाळांतून झाला आहे. तिथे १४८ विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. पहिल्यापासून इस्त्राईलमध्ये तसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमीच होता, कारण तिथे होम क्वारंटाईन अत्यंत कठोरपणे राबविले. मार्च च्या पहिल्या आठवड्यापासून त्याची खबरदारी घतल्याने नियंत्रणात आहे. त्यामुळेच १७ मे पासून शाळा सुरू करायला परवानगी देण्यात आली होती. पुढच्या दहा दिवसांत हॉटेल, रेस्टॉरंट, स्विमिंग पूल सुरू झाले. इस्त्राईलचे समुद्रकिनारे शनिवारी-रविवारी सुट्टीच्या दिवशी गर्दीने गजबजून गेले. सुट्टीचा आनंद घेताना सरकारने घालून दिलेले नियम सर्वांनी धाब्यावर बसवले. कोणीही मास्क घालत नव्हते आणि सोशल डिस्टंन्सिंगचे पालन होत नव्हते. त्याचा व्हायचा होता तोच परिणाम झाला आणि आता शाळा पुन्हा बंद कऱण्याची वेळ आली.

इस्त्राईल मध्ये १७३४० कोरोना बाधितांपैकी १५,०६४ रिकव्हर झाले आणि फक्त २९ रुग्ण गंभीर आहेत. मृतांची संख्या २९७ पर्यंत पोचली आहे.
दरम्यान, भारतात आता शैक्षणिक संस्थाना परवानगी देण्याच्या विचारात सरकार आहे. रोज १० हजाराने रुग्णांची संख्या वाढत असताना अशा परिस्थितीत शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा सरकार निर्णय घेत आहे. विद्यापीठांच्या परिक्षा तूर्तास नको असा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकर यांनी जाहीर केला, दुसरीकडे भाजपाने त्याची थट्टा करत परिक्षेशिवाय मुख्यमंत्री म्हणत टीका सुरू केली. राज्यपाल भगसिंह कोशारी यांनीही परिक्षा घेण्याची गरज व्यक्त केली आहे. शाळा- महाविद्यालये सुरू केली तर तयाचे काय परिणाम होतात याचा इस्त्राईल देशातील दाखला पुरेसा बोलका आहे.