इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी शाखेच्या वतीने मोफत रॅपिड एंटीजन टेस्ट ड्राईव्ह

0
336

भोसरी, दि. 22 (पीसीबी): समाजातील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या कमकुवत वर्गाच्या साठी आणि करोणाच्या फ्रन्टलाइन वर्कर साठी आय एम ए पिंपरी चिंचवड भोसरी शाखेच्यावतीने फ्री रॅपिड एंटीजन टेस्ट ड्राईव्ह हा एक मोठा उपक्रम राबवण्यात आला. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या सहकार्याने व त्यांच्या विनंतीला मान देऊन सर्वप्रथम पोलीस आयुक्त कार्यालय चिंचवड आणि नंतर निगडी, भोसरी, वाकड, पिंपरी व चिंचवड पोलीस स्टेशन मध्ये सर्व पोलीस दलाची तपासणी करण्यात आली. दिनांक 13 मे 2० मे या सात दिवसात 570 पोलीस स्टॉफची टेस्ट डॉक्टर सातव लॅबोरेटरी यांच्या सहकार्याने करण्यात आली फक्त तीन व्यक्ती पॉझिटिव आल्या. त्यांना होम अथवा हॉस्पिटल विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला.

आय एम ए पीसीबी चे अध्यक्ष डॉक्टर संजीव दाते, उपाध्यक्ष डॉक्टर माया भालेराव, पॅटरन डॉक्टर दिलीप कामत, डॉक्टर शैलजा माने डॉक्टर ललित धोका यांनी करोना,म्युक्युरोमायकोसिस, बद्दल माहिती सांगितली व लहान मुलांमध्ये येणाऱ्या तिसऱ्या लाटे बद्दल काय काळजी घ्यावी याचेही मार्गदर्शन केले. त्यासाठी आत्तापासूनच सर्वांनी सतर्क राहावे अशी सूचनाही केली. हा उपक्रम पॅटरन डॉक्टर दिलीप कामत सर यांच्या पुढाकाराने आणि पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या सहकार्याने उत्तम रीतीने पार पडला.

डॉक्टर विजय सातव यांच्या प्रयोग शाळेतर्फे ही सर्व तपासणी करण्यात आली. डॉ. देवधर डॉ. माटे, डॉ. शुभांगी कोठारी, डॉ. मंदार डोईफोडे, डॉ. हेमंत पाटील या कार्यकारणी सभासदांनी विविध ठिकाणी उपस्थित राहून या उपक्रमास हातभार लावला. समाजातील गरजू, आर्थिक दृष्ट्या दुर्बल व सामाजिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी आय एम ए पीसीबी तर्फे हा उपक्रम असाच चालू राहील त्यामुळे लवकर बाधित रुग्ण शोधून त्यांना वेगळे करून करोनाच्या तिसऱ्या लाटेपासून संरक्षण करता येईल चे अध्यक्ष डॉ. संजीव दाते यांनी सांगितले.