इंजिनिअर असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप खोत यांचा सत्कार

0
657

पिंपरी,दि.०३(पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्युनियर इंजिनिअर असोसिएशनची वार्षिक बैठक मंगळवारी (दि.३१) पालिकेच्या लोखंडे सभागृहात पार पडली. मावळते अध्यक्ष श्री जयकुमार गुजर यांच्या अध्यक्षतेखाली 21 नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष पदी झालेल्या निवडणुकीत श्री संदीप खोत यांनी विजय संपादन केला.

आज कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री अंबरभाऊ चिंचवडे व ग क्षेत्रीय कार्यालय अभियंता वर्ग यांच्या मार्फत ज्युनिअर इंजिनिअर असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री संदीप खोत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महासंघाचे सर्व पदाधिकारी व अभियंता उपस्थित होते.