आळंदीत कार पेटवून दिल्याच्या संशयातून पत्नीसह सासरकडच्याकडून जावयालाच मारहाण

0
501

आळंदी, दि. २६ (पीसीबी) – कार पेटवून दिल्याच्या संशयातून पत्नी, सासरा, मेहुणा आणि त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीने जावयाला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवार (दि.२५) दुपारी साडेबाराच्या सुमारास चऱ्होली खुर्द गावाच्या हद्दीतील पसायदाननगर राम मंदिरा मागे घडली.

जर्नाधन दत्तात्रय खोंडगे (वय ३२, रा. उर्से, ता. मावळ) असे मारहाण झालेल्या जावयाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पत्नी भाग्यश्री, सासरा मल्हारी शंकर काळे, मेहुणा सोहम आणि निखील चौधरी (सर्व रा. चऱ्होली खुर्द, वडागाव रोड, पसायदाननगर राम मंदिरा मागे) या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी काळे यांची कार अज्ञातांनी पेटवून नुकसान केले होते. याबाबत काळेंना जावई जर्नाधन यांच्यावर संशय होता. गुरुवारी दुपारी या संशयातून  पत्नी भाग्यश्री, सासरा मल्हारी काळे, मेहुणा सोहम आणि निखील चौधरी या सर्वांनी मिळून जर्नाधन याचा पाठलाग केला. तसेच त्यांना शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन जखमी केले. यादरम्यान जर्नाधन यांच्या खिशातील रोख ३ हजार रुपये आणि एक मोबाईल गहाळ झाला आहे. आळंदी पोलीस तपास करत आहेत.