आलियाचा ‘सडक २’ सडक वर येण्याच्या मार्गावर; हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप

0
453

मुंबई,दि.१४ (पीसीबी) : सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनं बाॅलिवूडमधील नेपोटीझम सगळ्यांचा निशाणा बनलाय. नेपोटिझमचा आरोप करत लोकांनी कारण जोहर, महेश भट्ट , आलिया भट्टला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं. आता याचाच परिणाम आता आलियाच्या ‘सडक 2’ चित्रपटा वर झालाय. आलियाच्या ‘सडक 2’ ट्रेलरला लाखोंनी नापंसती मिळालीये. युट्यूबवर डिसलाईकचा सामना करत असलेल्या ट्रेलर विरोधात आता विश्व हिंदू परिषदही मैदानात उतरली आहे.

आलियाच्या ‘सडक 2’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आलियाच्या तोंडी ‘खोट्या गुणांमुळे मी खूप गमावलं आहे’ असा संवाद आहे. विश्व हिंदू परिषदेनं या डायलॉग वर निशाणा साधत चित्रपटाच्या ट्रेलरला विरोध केला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमधून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप परिषदेनं केला आहे.’ महेश भट्ट यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या सडक 2 या चित्रपटात हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. या चित्रपटात नेपोटिझमचे प्रोडक्ट असून सरकारनं यावर कारवाई करावी.’, असं मत विश्व हिंदू परिषदेचे प्रचार प्रमुख विजय शंकर तिवारी यांनी व्यक्त केलं आहे.

या चित्रपटात संजय दत्त, आलिया भट्ट, पूजा भट्ट आणि आदित्य राय कपूर मुख्य भूमिकेत असून डिस्ने हाॅटस्टार या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर चित्रपट रिलीज होणार आहे. ‘सडक २’ वादाच्या भोवऱ्यात पुरता अडकलेला आहे.