आयएसडब्लूएआयच्या मान्यतेला डब्लूएफआयचे आव्हान,

0
210

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) : भारतीय शैली कुस्ती संघटनेला (आयएसडब्लूएआय) राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणून मान्यता देण्याच्या क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाला आज भारतीय कुस्ती महासंघाने (डब्लूएफआय) आव्हान दिले. ‘आयएसडब्लूएआय’ ला राष्ट्रीय क्रीडा महासंघाचा दर्जा देणे हे क्रीडा आचारसंहितेचे उल्लंघन करण्यासारखे आहे, असे त्यांनी आपल्या आव्हानात म्हटले आहे. क्रीडा मंत्रालयाने गेल्याच महिन्यात ‘आयएसडब्लूएआय’ ला मातीतील पारंपरिक कुस्ती जपण्यासाठी स्वतंत्र क्रीडा महासंघ म्हणून मान्यता दिली आहे.

क्रीडा मंत्रालयाने २०११ मध्ये तयार केलेल्या क्रीडा आचारसंहितेनुसार ‘आयएसडब्लूएआय’ ने कुठलेही काम केलेले नाही. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे एकाच खेळाच्या दोन स्वतंत्र संघटना असूच शकत नाही, असे त्यांनी क्रीडा मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. क्रीडा मंत्रालयाने कशाच्या आधारे या संघटनेला मान्यता दिली हेच कळत नाहीये. आम्ही तशी विचारणा क्रीडा मंत्रालयाकडे केली आहे. एकाच खेळाच्या दोन संघटना असूच शकत नाहीत. क्रीडा आचारसंहितेत असे स्पष्ट करण्यात आले आहे, असे कुस्ती महासंघातील एका पदाधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.

काही दिवसांपूर्वी मुक आणि बधिर कुस्तीगीरांची संघटना स्थापन करण्यावरून क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्तीगीर महासंघाकडे विचारणा केली होती. मग, ‘आयएसडब्लूएआय’ ला मान्यता देताना तशी विचारणा का करण्यात आली नाही, असा प्रश्नही या पत्रात विचारण्यात आला आहे. मुक आणि बधिरांच्या स्वतंत्र कुस्ती संघटनेच्या मान्यतेची विचारणा झाली तेव्हा आम्ही त्याला कडाडून विरोध केला होता. सर्व प्रकारच्या कुस्ती प्रचार आणि प्रसारावर आमचे नियंत्रण असेल आणि शिऱ संघटना म्हणून तो आमचा अधिकार आहे. मग, याच वेळी का विचारणा करण्यात आली नाही, असे ही या अधिकाऱ्याने सांगितले.

कुठल्याही संघटनेला राष्ट्रीय संघटना म्हणून मान्यता देताना त्यांच्यावर कुठली न्यायालयीन लढाई चालू नाही ना याची चौकशी केली जाते. अशी न्यायालयीन लढाई सुरू असेल, तर त्या वेळी मान्यतेसाठी संघटनेच्या प्रस्तावाचा विचार केला जात नाही. डब्लूएफआय आणि ‘आयएसडब्लूएआय’ यांच्यात २०१८ पासून न्यायालयीन लढाई सुरू आहे. मग, तरी या संघटनेला मान्यता कशी मिळते असेही या पत्रात लिहिण्यात आले आहे. क्रीडा आचारसंहितेच्या कलम ३.८ नुसार राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्याचा मान हा राष्ट्रीय क्रीडा महासंघाला असतो. गेली दोन वर्षे डब्ल्यूएफआयच्या वतीने मातीवरील कुस्तीच्या राष्ट्रीय स्पर्धा सातत्याने घेण्यात येत आहेत, हे देखिल पत्रातून क्रीडा मंत्रलायच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न महासंघाने केला आहे. त्याचबरोबर नियम ३.१५ नुसार राष्ट्रीय क्रीडा महासंघास त्या खेळाच्या जागितक संघटनेची मान्यता किंवा सलंग्नत्व असणे आवश्यक असते. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग संघटनेची ‘डब्लूएफआय’ला मान्यता आहे. त्यांनी ‘आयएसडब्लूएआय’ ला मान्यता दिलेली नाही, याचाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. हा पत्र व्यवहार झाला असला, तरी प्रत्यक्षात डब्लूएफआयचे अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंग यांनी या संदर्भात क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांची भेट घेतली असून, त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन रिजीजू यांनी दिले असल्याचे