आम्ही शब्दांचे पक्के आहोत, आम्हाला विरोधकांसारखा आकड्यांचा खेळ जमत नाही – अजित पवार

0
560

मुंबई,दि.७(पीसीबी) – मी काय, मुख्यमंत्री काय आम्ही शब्दांचे पक्के आहोत, आम्हाला विरोधकांसारखा आकड्यांचा खेळ जमत नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थसंकल्पावर विरोधी पक्षाकडून सडकून टीका करण्यात आली. विरोधकांनी केलेल्या टीकेवरून अजित पवारांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

मी काय, मुख्यमंत्री काय आम्ही शब्दांचे पक्के आहोत आणि विरोधकांसारखा शब्दांचा, आकड्यांचा खेळ आम्हाला जमत नसल्याचं म्हणत विरोधकांना लक्ष्य केलं त्यासोबत त्यांनी राज्यात राबवण्यात येणाऱ्या योजनांचीही माहिती दिली.