आम्हालाही बढती, वाढीव वेतनश्रेणी द्या; प्लंबरची आयुक्तांकडे मागणी

0
405

 पिंपरी दि. १२ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर आम्ही प्लंबर काम करत आहोत. नेमून दिलेल्या ठिकाणी कामकाज करत आहोत. आमचे एकाकी पद आहे. त्यामुळे हेड प्लंबर पद निर्माण करुन बढती द्यावी. वेतनश्रेणीमध्ये वाढ करावी, अशी मागणी पालिकेच्या प्लंबरनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली.

जैवविविधता समितीच्या सभापती, नगरसेविका उषा मुंढे यांच्यासह प्लंबरच्या शिष्टमंडळाने आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. महापालिकेचा पाणीपुरवठा विभागामध्ये काम करण्यासाठी 52 प्लंबर होते. त्यातील काही सेवानिवृत्त व मयत झाले. आता केवळ 36 प्लंबर आहेत. आम्ही संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याचे काम करतो. पाणीपुरवठा सुरळित ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो. वरिष्ठांनी सांगितलेली कामे अगदी प्रामाणिकपणे पार पाडतो.

प्लंबर पद एकाकी संवर्गातील असून आम्हाला पदोन्नतीचा मार्ग नाही. आमचे तांत्रिक पद असतानाही आम्हाला निवृत्तीपर्यंत एकाच पदावर कामकाज करावे लागते. परंतु, काही वर्षांपूर्वी हेड प्लंबर पद निर्माण करण्यात आले होते. पण, काही कारणास्तव पुढे ते देण्यात आले नाही. यापूर्वी काही एकाकी पदाना वरिष्ठ पद व वाढीव वेतन श्रेनी निर्माण करण्यात आली आहेत. वास्तविक पाहता दोन्ही पदाचे कामकाज सारखेच आहे, परंतु, बदल झाला तो वेतश्रेणीमध्ये याचप्रमाणे प्लंबर या पदाला हेड प्लंबर हे पद निर्माण करुन वेतनश्रेणी वाढ करण्यात यावी. इतर पदाप्रमाणे प्लंबर या एकाकी पदाची कुटीलता कमी करण्यासाठी हेड प्लंबर हे पद निर्माण करावे. प्लंबर या एकाकी पदास न्याय मिळवून द्यावा.

जैवविविधता समितीच्या सभापती उषा मुंढे म्हणाल्या, ”शहराच्या पाणीपुरवठा सुरळित ठेवण्याचे काम प्लंबर करतात. त्यांच्या पदाला पदोन्नती नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने हेड प्लंबर पदाची निर्मिती करावी. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवून मंजुरी घ्यावी. प्लंबरला हेड प्लंबरपदी बढती देऊन वेतनश्रेणी वाढ करण्यात यावी. आयुक्त राजेश पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे लवकरच प्लंबर या पदाला न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास आहे”.