आम्रपाली ग्रुपविरोधात धोनीची सुप्रीम कोर्टात धाव

0
514

मुंबई, दि. २७ (पीसीबी) –  महेंद्रसिंह धोनीने आम्रपाली ग्रुपविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आम्रपाली ग्रुपने आपले ४० कोटी रुपये थकवल्याचा दावा धोनीने दाखल केलेल्या याचिकेत केला आहे.

धोनी आम्रपाली ग्रुपचा ब्रँड अॅम्बेसेडर होता.  मात्र आम्रपाली ग्रुपने करारानुसार आपले मानधन दिले नसल्याचा आरोप धोनीने केला आहे. घर खरेदीत अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आम्रपाली ग्रुपवर आहे. आम्रपाली ग्रुपने पैसे घेऊन घर न दिल्याचा आरोप ४५ हजार ग्राहकांनी केला आहे. याप्रकरणी आम्रपाली ग्रुपविरोधात सुप्रीम कोर्टात याचिक दाखल करण्यात आली आहे. आता धोनीनेही याचिका दाखल केल्याने पुन्हा एकदा आम्रपाली ग्रुप वादात सापडला आहे.