आनंदाची बातमी ! पिंपरी चिंचवडमधील 4 जण ओमिक्रॉन मुक्त..

0
305

पुणे, दि. १० (पीसीबी) : महाराष्ट्रात ओमिक्रॉन वेरिएंटचे 10 रुग्ण आढळल्याचं समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्कता बाळगण्यात येत होती. 10 रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणेचं टेन्शन वाढलं होतं. मात्र आता दिलासा देणारी बातमी समोर आली असून डोंबिवलीतील युवक ओमिक्रॉन वेरिएंटच्या संसर्गातून मुक्त झाल्यानंतर पुण्यातील एक आणि पिंपरी चिंचवडमधील 4 जण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात आता ओमिक्रॉनचे चार सक्रिय रुग्ण आहेत.

पुण्यात फिनलंडवरून आलेल्या रुग्णाची ओमिक्रॉन टेस्ट निगेटिव्ह आली आहे. 29 नोव्हेंबरला त्याला ताप आल्यावर त्याची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर चाचणी केली असता तो ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला होता. अखेर निगेटिव्ह आल्यानंतर 10 दिवसानंतर आज त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.पिंपरी चिंचवडमधील सहा जणांना ओमिक्रॉन संसर्ग झाला होता. त्यापैकी चार ओमिक्रॉन रुग्ण निगेटिव्ह झाले आहेत. यात 44 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, सात आणि दीड वर्षीय मुलींचा समावेश आहे. 12 आणि 18 वर्षीय मुलींचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
राज्यात ओमिक्रॉन ससंर्गाचे 10 रुग्ण आढळले होते. कल्याण डोंबिवलीत 1, पिपंरी चिंचवडमध्ये 6 आणि पुण्यात एक आणि मुंबईत 2 असे महाराष्ट्रात एकूण 10 रुग्ण आढळले होते. त्यापैकी कल्याण डोंबिवलीतील रुग्ण कालच बरा झाला होता. आज पुण्यातील एका रुग्ण आणि पिंपरी चिंचवडमधील चार रुग्ण ओमिक्रॉनमधून मुक्त झाल्यानं राज्याला दिलासा मिळाला आहे. राज्यात सद्या मुंबईतील दोन आणि पिंपरीतील 2 असे चार सक्रिय रुग्ण आहेत.