आनंदनगर झोपडपट्टीत कोरोना रुग्ण वाढिला प्रशासन जबाबदार – माजी नगरसेवक रामचंद्र माने यांचा आरोप

0
361

पिंपरी,दि.20 (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त व त्यांच्या प्रशासनाच्या हलगर्जी पणामूळे आनंदनगर मध्ये कोरोना रूग्णांची वाढ झाली. प्रामुख्यने सह आयुक्त, साह्यक आयुक्त खोत हे त्याला जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप माजी नगरसेवक रामचंद्र माने यानी प्रसिद्धी पत्रकात केला आहे.

पत्रकात ते म्हणतात, झोपड्यात राहणारे कुटुंबातील लोक किती असतात, झोपडी किती लहान असते, त्यातच सोशल डिस्टन्स कसे पाळणार हा प्रश्न असतो. सोशल डिस्टसींगचा पुरता बट्याबोळ झाला. बाहेरून पोलीसी दणका, झोपडीत जागा नाही अशा परिस्थितीत कोरोना महामारीची लागन होणार नाही काय ?, असा प्रश्न माने यानी उपस्थित केला आहे. आनंदनगर ही हातावर पोट भरणा-या मजूरांची दाट वस्ती आहे. लॉकडाउनमुळे काम नाही, मग खाणार काय हा प्रश्न आहे. सकाळी संध्याकाळी जे जेवण येते त्यावेळी भाताच्या पुड्यासाठी धावपळ असते. धान्य वाटण्यासाठी कार्यकारी अभियंता यांच्यावर जबाबदारी सोपल्याची माहिती महापालिकेने कळवली होती. पण ही जबाबदारी साह्यक आयुक्त खोत, अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांची असताना त्यानी धान्य वाटणा-या सेवाभावी संस्था झोपडपटीत वाटत आहेत की नाही याची खात्री करयला पाहिजे होती. आवई ऊठवून धान्य वाटपाचा बट्याबोळ केला. कुणी धान्य दिले आणि कुणाला वाटले याचे नियंत्रण पवार व खोत यांच्याकडे होते. पण झोपडपट्टीवासीया बाबतची ऊदासीनता, मनात खदखद असल्याने ज्या संस्थेकडून धान्य मिळाले होते. त्याचा विनीयोग नीट केला नाही. त्यामुळेच केवळ भातासाठी गर्दी झाली नसती. आम्ही याबाबत आयुक्त श्रावण हार्डिकर व खोत यांना सूचना केल्या होत्या,पण मला खोत यांनी फोन करून ते खूप कामात आसतात असा बहाना सांगीतला व याकडे दुर्लक्ष केले. आयुक्तांनी व अतिरिक्त आयुक्तांनी का दुर्लक्ष केले, ते त्यांनाच माहीत.पण त्यांच्या हलगर्जी पणामुळेच आनंदनगर मध्ये रूग्णांची संख्या वाढली आहे.आता सुध्दा याबाबत कांही सुधारणा होईल यात सुतराम शक्यता दिसत नाही.उपाशी पोटी राहून झोपडीत दाटीवाटीने राहिल्याने काय होणार! झोनिपुचे साह्यक आयुक्त ,झोपडपट्यात काम केलेले कार्यकारी अभियंता,अतिरिक्त आयुक्त आजी माजी नगरसेवक यांची बैठक घेऊन याबाबत काय उपाययोजना करता येतील त्या तत्काल करून या महामारीचा सामना करून ती आटोक्यात आणावी, असे माने यानी सुचविले आहे.