आदित्य ठाकरे कोणत्या मतदारसंघातून विधानसभा लढवतील, मिलिंद नार्वेकर म्हणतात…

0
472

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवल्यास  १०० टक्के आवडेल. मात्र, याबाबतचा निर्णय स्वत: आदित्य किंवा  उद्धवजी घेतील, असे शिवसेनेचे सचिव  मिलिंद नार्वेकर यांनी म्हटले आहे. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नार्वेकर म्हणाले की, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय आदित्य ठाकरे स्वत: किंवा उद्धव ठाकरे घेतील. निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. आदित्य ठाकरे जो निर्णय घेतील त्यांचे शिवसैनिक स्वागत करतील.

आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवल्याचा निर्णय घेतल्यास  त्यांचा मतदारसंघ कोणता असेल, या प्रश्नावर मिलिंद नार्वेकर म्हणाले  की,  संपूर्ण महाराष्ट्रच आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असेल.

दरम्यान, हीच वेळ आहे… हीच संधी आहे. लक्ष्य- विधानसभा २०१९ …  महाराष्ट्र वाट पाहतोय आदित्य ठाकरे.. असे युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांच्या  इन्स्टाग्राम पोस्टनंतर आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना सुरूवात झाली आहे.