एक्झिट पोल; आदित्य ठाकरे, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, अमित देशमुख, पंकजा मुंडे, विश्वजित कदम जिंकणार का ?

0
850

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीत महायुतीला २१०  (१९८ ते २२२) जागा तर महाआघाडीला ६३ (४९ ते ७५) जागा मिळतील. इतर पक्ष आणि अपक्षांना १५  (४ ते २१) जागा  मिळतील, असा अंदाज  एबीपी माझा सी वोटरने  केलेल्या एक्झिट पोलमधून व्यक्त केला आहे.

या सर्व्हेत राज्यातील तुल्यबळ झालेल्या लढतीच्या निकालाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. यात वरळीतून आदित्य ठाकरे आघाडीवर  असून काँग्रेसचे सुरेश माने पिछाडीवर आहेत. मुंबईतील वांद्रे पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर आघाडीवर असून झिशान सिद्दीकी आणि बंडखोर तृप्ती सावंत पिछाडीवर  आहेत.  लातूर ग्रामीणमधून काँग्रेसचे धीरज देशमुख आघाडीवर तर शिवसेनेचे सचिन देशमुख पिछाडीवर, लातूर शहरमधून अमित देशमुख आघाडीवर तर भाजपचे शैलेश लाहोटी पिछाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

वर्सोवा मतदारसंघात भाजपच्या भारती लव्हेकर आघाडीवर असल्याचा अंदाज आहे. तर अपक्ष लढणाऱ्या राजुल पटेल आणि काँग्रेसचे बलदेव खोसा पिछाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार आघाडीवर असल्याचा अंदाज  व्यक्त करण्यात आला आहे.  तर भाजप उमेदवार गोपिचंद पडळकर  पिछाडीवर आहेत. कराड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर तर भाजपचे अतुल भोसले पिछाडीवर असल्याचा अंदाज आहे. पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेसचे विश्वजीत कदम आघाडीवर तर शिवसेनेचे संजय विभूते पिछाडीवर असल्याचा अंदाज आहे. परळी मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे आघाडीवर तर राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे पिछाडीवर असल्याचा अंदाज आहे.