“आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे”

0
228

मुंबई,दि.१२(पीसीबी) – “काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. महाराष्ट्रातही पहाटेचे ऑपरेशन फसले. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे” अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. नारायण राणे यांनी महाराष्ट्र सरकार सप्टेंबरपर्यंत पडण्याचे भाकित वर्तवल्यानंतर ‘सामना’तून राणेंना भोंदू डॉक्टरांची उपमा देण्यात आली आहे.

‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर सिंग’प्रमाणे ‘ऑपरेशन कमळ’ची दहशत निर्माण केलीच होती. “सो जा बच्चे, नही तो गब्बर आ जायेगा” या धर्तीवर विरोधी सरकारांनी सरळ गुडघे टेकावेत, नाहीतर ‘ऑपरेशन कमल हो जायेगा’ या भीतीचे सावट निर्माण करण्यात आले होते. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करुन भाजपला धडा दिला, असा टोला अग्रलेखातून लगावला आहे.

दरम्यान, “राजस्थानमधले ऑपरेशन महिनाभर चालले व फसले. भाजपने आता तरी धडा घ्यावा. थोडे थांबायला काय हरकत आहे. थांबा आणि पुढे जा, वळणावर धोका आहेच” असा सल्ला शिवसेनेने भाजपला दिला आहे.