पिंपरी-चिंचवडमध्ये विरुध्द दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांना आयुक्त बक्षिस देणार

0
1274

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – विरुध्द दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करणाऱ्या प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यास पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन स्वत: बक्षिस देणार असल्याची अनोखी योजन आज (गुरुवार) जाहिर करण्यात आली. या योजने अंतर्गत कोणत्याही पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी हा पिंपरी-चिंचवड पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करु शकणार आहे.  

पोलीस कर्मचाऱ्याने संबंधित वाहन चालकावर कायदेशीर कारवाई करुन त्यांचा वाहन परवाना आयुक्तांकडे सोपवल्यानंतर एका दुचाकी मागे १०० तर चारचाकी मागे ५०० रुपये बक्षीस दिले जाणार आहे. या योजनेमध्ये प्रत्येक पोलिस कर्मचारी उत्सुकतेने भाग घेतील आणि त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागेल असा विश्वास आयुक्त पद्मनाभन यांनी व्यक्त केला आहे.

तसेच या योजनेतील बक्षिसाची रक्कम महत्वाची नसून आपण करत असलेल्या कामगिरीची दखल वरिष्ठ घेत आहेत, ही भावना कर्मचाऱ्यांमध्ये जागवणे म्हत्वाचे आहे. ज्यामुळे पोलिस कर्मचारी उत्सफूर्तपणे काम करतील आणि विरुध्द दिशेने येणाऱ्या वाहन चालकांना आळा बसले. तसेच शहर परिसरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यात मदत होईल. यापुढे देखील अशा प्रकारच्या योजना पोलीस आयुक्त कार्यालयाकडून राबवल्या जाणार आहेत, अशी माहिती देखील पद्मनाभन यांनी यावेळी दिली.