आता महाराष्ट्रातही भाजप राष्ट्रवादीचे सरकार

0
238

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाते. शरद पवार यांच्या याच चाणिक्यनितीचा वापर करत भाजप नागालँडमध्ये सत्तेत सहभागी होणार आहे. नागालँडमधील एनडीपीपी-भाजप आघाडीला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा आश्चर्यजनक निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. राजकारणाचे हेच नवे समीकरण आता महाराष्ट्रातही पहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात भाजप राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत येवू शकते. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. राजेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणार
नागालँड निवडणुकांच्या निकालाचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात पहायला मिळणार आहे. नागालँड विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लक्षवेधी यश मिळवले आहे. राष्ट्रवादीने इथं पहिल्यांदाच सात जागा जिंकल्या. मात्र, 10 जागांचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी विरोधी पक्षासाठी दावा करप शकत नाही. यामुळे सरकारला पाठिंबा देत थेट सत्ताधाऱ्यांसोबत बसण्याच्या निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे.

नागालँड विधानसभेत 60 आमदार आहेत. यापैकी एनडीपीपीचे 25 आमदार आहेत. भाजपनं 12 जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 आमदार विजयी झाले आहेत. एनडीपीपी-भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादीनं घेतला आहे.